चैतन्य महाराजांवर गुन्हा ; किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण? रिलस्टार, युट्युबवर पोलिसांकडे तक्रार

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कीर्तने लोकांच्या मनात घर करून बसली आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यांच्या किर्तनात सामाजिक वास्तवाचा अद्भुत संगम असतो, जो लोकांना भावून जातो.
नव्या पिढीचे वारकरीही आपल्याला सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतात. चैतन्य महाराज वाडेकर हे त्यातीलच एक उदाहरण आहेत.
सोशल मीडियावर चैतन्य महाराज वाडेकर तरुणांना प्रेरणादायी सल्ले आणि उपदेश देत असतात. परंतु, स्वतःचे आचरण आणि उपदेश जुळून येत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. याच कारणामुळे, पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना एका गुन्ह्यात अटक केली आहे.
बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात जमीन वादामुळे तणाव निर्माण झाला. या वादातून चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांवर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर
युवा किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1994 रोजी पुणे जिल्ह्यातील भांबोली गावात झाला. त्यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथून माध्यमिक शिक्षण आणि संत साहित्य शिकले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. आजकाल ते आपल्या किर्तनांमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत.इंस्टाग्राम आणि युट्यूबवरील त्यांचे लाखो फॉलोअर्स त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक आहेत. मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक असून, ते या संस्थेच्या माध्यमातून वारकरी संत साहित्याचा प्रसार करण्याचे काम करतात. युवा पिढीला प्रेरणादायी उपदेश देणारे किर्तनकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या किर्तनांमुळे रिल्स आणि युट्यूबवर त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
काय आहे प्रकरण?
चैतन्य वाडेकर यांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी एका बिल्डरच्या जमिनीवरील रस्ता आणि कंपाऊंड उखडून टाकला. यामुळे दोघांमध्ये जमीन वाद निर्माण झाला आहे.
चाकण एमआयडीसीतील जमीन वादात सापडलेले युवा किर्तनकार चैतन्य वाडेकर यांच्या कृतींनी समाजात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर उपदेश देणारे वाडेकर स्वतः कायद्याच्या कठोर हातची चपेटीत आले आहेत. त्यांच्याकडून झालेल्या अतिक्रमणाच्या घटनांनी त्यांची प्रतिमा धक्का बसली आहे.
वाडेकर यांनी बिल्डरच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने आल्यावर त्यांनी उत्सुकतेतून हा कृत्य केले. मात्र, कायदा हातात घेणे हे योग्य नव्हते. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता आणि कंपाऊंड उखडून टाकून गंभीर गुन्हा केला.पोलिसांनी या प्रकरणी वाडेकर आणि त्यांच्या भावांना अटक केली आहे.सुरुवातीला पोलिसांनी सबुरीने घेतलं, मात्र पोलिसांची सहनशीलता अखेर संपली. चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी कायद्याचे डोस पाजले. मग हळूहळू करत आपल्या चुका मान्य करू लागले. सोशल मीडियावर हवा करणाऱ्या चैतन्य वाडेकरांना अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. या घटनेमुळे सोशल मीडियावरील त्यांची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता आहे. त्यांचे लाखो फॉलोअर्स आता त्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.