कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर ): चांदवड तालुक्यात बोपाणे शिवारात मुलगा शिवांश दौलत गांगुर्डे  वय दोन वर्षे विहिरीत पडल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयतनात आई पुजा दौलत गांगुर्डे वय 26 देखील तोल  जाऊन विहिरीत पडली मुळा स आई देखील पाण्यात बुडाल्याने दोघांचा अंतर झाल्याने दुर्दैवी घटना घडली पंचक्रोशीत शोककळा पसरली बोपाने शिवारात पुजा गांगुर्डे ह्या आपल्या विहिरीवर ड्रीप इरिगेशनचे कॉक फिरवत असताना सोबत आलेल्या दोन वर्षाचा शिवाश विहिरीत पडल्याने त्यास वाचवण्याच्या घाईगडबडीत च्या प्रयत्नात आई पूजा ही विहिरीत तोल जाऊन पडल्याने पाण्यात दोघांचाही मृत्यू झाला .

विहिरीचे काम नुकतेच झाले हो ते त्यामुळे विहिरीला कटाडा नसल्याने ही दुर्देवी घटना घडली पावसाळा असल्याने विहीर पूर्ण भरलेली होती त्यामुळे आई व मुलगा यांचे मृत्यू देह सापडण्यास बराच उशीर झाला प्रथम आईचा मृत्यू देह सापडला  तर मुलगा शिवांश खोल पाणी असल्याने सापडत नसल्याने अखेर पोलिसांनी व ग्रामस्थांनी  पाच  मोटारींच्या साह्याने  विहिरीतिल पाणी  उपसा करण्यात येऊन  रात्री उशिरा मुलाचा मृत्यू देह काढण्यात आला  व शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले  यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ  व उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे  व पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

By कैलास सोनवणे

कैलास सोनवणे: कैलास सोनवणे हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध बातमीदार आहेत. त्यांना बातमी लेखनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. सध्या ते दिघवद गावात राहतात, आणि शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पत्रकारितेत आणि शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Translate »