धनगरी नृत्य आणि चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे
( कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)) धनगरी नृत्य आणि चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर मातोश्रींचे हे त्रिशताब्दी वर्ष साजरी करत आहेत त्यानिमित्त मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य वतीने चांदवड येथे रंगमहाल होळकर वाडा या ठिकाणी मातोश्रींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे विचारवंत या चांदवड नगरीमध्ये आले.या होळकर वाड्यात मोरे क्रांती महासंघ यांनी आपले तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेचे उद्घाटक माननीय सुभाष पवार साहेब होळकर ट्रस्ट औरंगाबाद चांदवड अध्यक्ष हे होते तसेच होळकर वाड्याची माहिती देण्यासाठी संजय बिरारी इतिहासकार यांनी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या सदस्यांना होळकर वाड्याची व चांदवडची माहिती सांगितली व तसेच चांदवडी रुपया व नाणी प्रदर्शन होळकर वाड्यात ठेवण्यात आली.रेणुका माता मंदिराची दर्शन घेऊन या सोहळ्यास सुरुवात झाली व त्या ठिकाणी धनगरी नृत्याची गज नृत्य मध्ये सुरुवात केली.
धनगर नृत्यावर सर्वच होळकर प्रेमी व चांदवड मधील जनता ठेका धरला होळकर वेशीतून संपूर्ण चांदवड मध्ये या नृत्याने आवाज केला.तसेच रेणुका लॉन्स या ठिकाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार घालून तसेच धनगरी नृत्य व सुंभारण हे गीत गाऊन या परिषदेची सुरुवात केली.परिषदेचे उद्घाटक शिवाजी शेंडगे हे होते. तसेच अध्यक्ष माननीय बलभीम माथेलेहे होते. प्रमुख पाहुणे म्हणून यादव सर होळकर घराण्याची वंशज मुकुंदराज होळकर, शिवाजी शेंडगे,समज नेते मच्छिंद्र भाऊ बिडकर, विठ्ठल भाऊ मारणार, हनुमंत दुधाळ, समाधान बागल सामाजिक कार्यकर्ते प्रास्ताविक राजू हाके सर यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश कुठे सर यांनी केले
माननीय आर एस यादव सर यांना मोरे क्रांती महासंघ यांच्याकडून सत्यशोधक विचाराचे अन्याय माननीय मारुती रावजी पिसाळ मामा यांच्या स्मरणार्थ सत्यशोधक पुरस्कार देण्यात आला.विठ्ठल भाऊ मारणार यांना ठेलारी समाजाचे नेते पुरस्काराने गौरवण्यात आले.चांदवड येथे होळकर न नगरीचा इतिहास जागृत करण्यासाठी मोरे क्रांती महासंघाचा नासिक जिल्हा व चांदवड च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक सदस्य समाधान बागल.मुकुंदराज होळकर मच्छिंद्र भाऊ बिडकर अमोल गजभार सर साहेबराव बागल बापू शिंदे पिंटू गाडे,यांच्या वतीने सन्मानचिन्ह तसेच अहिल्यादेवींची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर अनेक विषयांवर ती विचारवंतांचे व्याख्यान झाली. विचार परिवर्तन सर्व परिवर्तनाचे मूळ आहे या विषयावरती माननीय तुकाराम जानकर साहेब यांनी आपली भूमिका मांडली. समाज परिवर्तनाच्या कार्यात बुद्धिजीवी वर्गाची भूमिका काय असावी हे डॉक्टर एडवोकेट उत्तम भाई कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून परिषदेत मांडले. संचित धनवे महानायक खंडोबा यांचे लेखक यांनी खंडोबा आणि सिंधू संस्कृतीचा वारसा आजच्या काळात प्रसंगी बनवून बहुजन समाजाचे उत्खनन करण्याची कार्यपद्धती काय असायला हवी या विषयावरती परिषदेमध्ये विशद केले.
दुसऱ्या सत्रामध्ये आरक्षणच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेली भांडणे जातीय द्वेष न वाढवता समोपचाराच्या पद्धतीने सोडवण्याची प्रक्रिया काय असायला हवी यावर डॉक्टर दत्तात्रय भरणे सत्यवान दुधाळ यांनी आपले विचार मांडले समाज परिवर्तनाच्या कार्यात महिलांनी कोणती भूमिका घ्यावी या विषयावरती माननीय इंजिनियर मनीषा दुकाने, व माननीय अडवोकेट ऋचा हाकेयांनी आपली भूमिका मांडली.
विचार व्यक्तीला समाजाला वाहन बनवतो विचारांचा प्रचार प्रसार करणारी यंत्रणा म्हणजे संघटनेचा वाढ विस्तार करण्यासाठी आपली भूमिका काय असायला पाहिजे यावरती संदीपदासनोर माननीय अजय पडघन यांनी आपली भूमिका मांडली,
शेवटी आभार प्रदर्शन सौ शैला नवघरे यांनी केले.