भारत निवडणूक आयोगाच्या IIIDEM नवी दिल्ली येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्नचांदवड तालुक्यातून श्री. प्रकाश बंजारा उपक्रमशील शिक्षक यांची निवड


कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड, व लडाख राज्यातील मतदान नोंदणी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या करीता विशेष प्रशिक्षण दि. 03 व 04 जुलै 2025 रोजी निवडणूक आयोगाच्या भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था,IIIDEM नवी दिल्ली येथे आयोजीत करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास करीता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र या कार्यालयाने नामनिर्देश केलेल्या २ जिल्हा निवडणूक अधिकारी, 11, मतदार नोंदणी अधिकारी व १४४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/पर्यवेक्षक यांनी सहभाग नोंदवून मतदान नोंदणी व निवडणूक विषयक विविध कार्य प्रशिक्षण पूर्ण केले.
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री.कैलास कडलग मतदार नोंदणी अधिकारी, (चांदवड तहसील, यांनी पर्यवेक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले तर श्री. प्रकाश भंगा बंजारा, प्राथमिक शिक्षक, दिघवद मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यादी भाग-260 (118 चांदवड विधानसभा मतदार संघ )यांची तहसील कार्यालय, चांदवड मार्फत निवड करण्यात आली होती. श्री बंजारा यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले.
.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी श्री. किरण म. शार्दुल, यांचे हस्ते सर्व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल श्री.बंजारा यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले
सदर प्रशिक्षणात भारत निवडणूक निर्देशित नॅशनल लेव्हल मास्टर ट्रेनर (NLMT), तथा उपजिल्हाधिकारी मूर्तिजापूर श्री संदीपकुमार अपार साहेब, उपजिल्हाधिकारी तथा SLMT श्री.बालाजी शेवाळे, SLMT श्री.हिंगोले यांनी विशेष प्रशिक्षण देऊन राज्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/पर्यवेक्षक यांना प्रशिक्षित केले.

पत्रकार -

Translate »