कै.एन.के.ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी


काजीसांगवीः उत्तम आवारे काजीसांगवी विद्यालयात सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचे पूजन करून नारळ वाढविण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षिका श्रीम.वारके एस.डी.व सर्वच शालेय घटकांनी व ग्रामस्थांनी पालखी पूजन केले.श्री.तुकाराम दादा रेडगाव यांनी सुंदर असा अभंग म्हणत पालखी सोहळा सुरू झाला. टाळ-मृदुंग गजरात संपूर्ण काजीसांगवी गावात विद्यार्थी ,शिक्षक व वारकरी यांनी विठू नामाचा गजर केला.गावातून घरोघरी विठ्ठलभक्तांनी व महिलांनी पालखी पूजन केले.
कार्यक्रमात तालुका संचालक डॉ सयाजीराव गायकवाड साहेब व सेवक संचालक श्री.निंबाळकर सर ,पोलीस पाटील,सरपंच -सदस्य,विविध सोसायटीच्या अध्यक्ष व सदस्य,पत्रकार बंधू व संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी पालखी सोहळ्याची शोभा वाढविली.
विद्यार्थ्यांनी गावात रिंगण फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शालेय घटकांचे सहकार्य लाभले.फलकलेखन श्री ठाकरे पी.पी.यांनी केले.सांस्कृतिक समितीने सर्वांचे आभार मानले.

पत्रकार -

You may have missed

Translate »