श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबाद प्रमाणे *गुरुवार दिनांक - १० जुलै २०२५* रोजी *गुरुपौर्णिमोत्सव सोहळा* साजरा करण्यात येत आहे. महामुनी भगवान श्री कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने , महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबादप्रमाणे श्री *गुरुपौर्णिमोत्सव सोहळा* मोठ्या भक्ती भावाने साजरा होत आहे. तरी भाविकांनी सात्विक भावाने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. *कार्यक्रमाची रूपरेषा :-*

सकाळी – ०४ वा. चंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक
सकाळी – ०५ वा. श्री चंद्रेश्वर बाबा समाधी पूजन
सकाळी – ०६ ते १० वाजेपर्यंत गुरुपूजन
सकाळी – १० वा. प्रवचन
सकाळी – १० ते १२ वाजेपर्यंत गुरुमंत्र दीक्षा
दुपारी – १२ वाजता भंडारा / महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला आहे.

पत्रकार -

You may have missed

Translate »