भाटगाव ते तळवाडे रस्ता दुरुस्तीची मागणी
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील भाटगाव ते तळवाडे रस्ता दोन महिन्यात पावसाने पुर्ण फुटल्याने दळणवळण थांबले असुन भाठगाव येथे माध्यमिक विद्यालय असुन तेथे तळवाडे चिंचोले गावातिल शिवारातील विध्यार्थी रोज जातात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वहान धारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे रस्त्यावर खड्डे पडल्याने मुला मुलींना चालू असलेल्या पावसामुळे चालणे कठीण झाले आहे या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करुनही होत नसल्याने शेतकरी व तळवाडे चिंचोले परीसरात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे काही ठिकाणी रस्त्यात खड्डे पडले असून दोन चाकी व मोठाले वहानांची चाके निखाळण्याची भिती व्यक्त केली आहे ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भाऊसाहेब जाधव संपत जाधव केतन जाधव आनंदा जाधव संतोष जाधव शिवाजी जाधव भाऊ जाधव अशोक जाधव व परिसरातील पालक व शेतकर्यांनी केली आहे.


