कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद,संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात महर्षी व्यास यांचा जन्मदिवस, गुरुपौर्णिमा अर्थात गुरुपूजन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः”. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून गुरूला मानाचे,आदराचे स्थान दिले असून गुरुपरंपरेचे वर्णन आलेले आहेअगदी रामायण, महाभारतामध्ये सुद्धा गुरु शिष्याची महती सांगितलेली आहे. “गुरुविण मज कोण दाखवील वाट,आयुष्याचा पथ अवघड दुर्गम डोंगर घाट”. या सुवचनाप्रमाणे प्रत्येकाच्या जीवन प्रवासाच्या मार्गात वेगवेगळ्या वळणावरती अनेक गुरु मार्गदर्शक भेटतात या अनेक गुरूपैकी आमच्या आयुष्याला आकार देणारे,आम्हाला घडविणारे दोन गुरु फार महत्वाचे असतात ते म्हणजे आमचे आई, वडील आणि शिक्षक. कुंभार ज्याप्रमाणे चिखलाच्या गोळ्याला आकार देत असतो त्या पद्धतीने हे गुरु आमच्या आयुष्याला आकार देत असतात. त्यामुळे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिघवद विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. यामध्ये सर्व गुरुवर्यांचे पूजन करून यथोचित सन्मान करण्यात आला.ह्या वेळी साक्षी ठाकरे,अनुष्का गांगुर्डे, शुभम मापारी, सुष्टी पानसरे, गांगुर्डे ह्या विद्यार्थ्यांचे तसेच उपशिक्षिका हर्षाली भामरे, पर्यवेक्षक किशोर गांगुर्डे, मुख्याध्यापक सदाशिव गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी केले.त्यात श्रेया झाल्टे,दिव्या ठाकरे,कांचन ठोके, तनुजा नवले, साधना डोंगरे,अनुजा खुटे इत्यादी. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.गांगुर्डे पर्यवेक्षक के.पी.गांगुर्डे,ज्येष्ठ शिक्षक अर्जुन गांगुर्डे,शशिकांत गांगुर्डे, प्रभाकर पेंढारी,सुनिल गांगुर्डे,अमोल ठोंबरे,संदीप पाटील,सुनिल चंदनशिव,गणेश गांगुर्डे,शुभम हांडगे,सुधीर ठाकरे शिक्षिका कलूबाई साबळे,सुनिता राठोड,रेणूका कानडे,हर्षाली भामरे,रमा नगरारे शिक्षकेतर मधुकर गोसावी,सागर गांगुर्डे,धनंजय गांगुर्डे,साहेबराव घोलप आदि उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »