शेतीसाठी जोडधंदा केला पाहिजे फार्मरः गौतम काळे
काजीसांगवीः उत्तम आवारे शेती आणि शेतकरी व जोडधंदा हा केलाच पाहिजे कारण कि आजच्या मार्केट मध्ये आपण काही घेण्यासाठी गेलो तर खिशात पैसे असायला पाहिजे. पण शेतीतून पैसे मिळवणे खूपच अवघड आहे कारण नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभाव यातून प्रॉफिट मिळवणे जिकरीचे झाले आहे त्यामुळे आम्ही मार्केट सर्वे करत असताना एक लक्षात आले कि आपल्या जवळ असलेल्या शेतीमधून व पिकवत असलेल्या शेतीमधून मका, गहू बाजरी ज्वारी या पिकांचा आणि राहिलेल्या wastage चा वापर करून काय करू शकतो आणि त्यातून आर्थिक नफा कसा मिळेल हे शोधत असताना असे लक्षात आले कि शेळीपालन केले पाहिजे पण चारायला जायला आता जागा शिल्लक नाही त्यामुळे आपण बांधिस्त शेळीपालन करू शकतो का? व कुठली जात आहे व वजन वाढ चांगली होते, आजारी कमी पडते व आर्थिक नफा चांगला मिळू शकतो हे शोधात व research करत असतांना असे लक्षात आले कि आफ्रिका या देशातील एक जात African बोअर गोट आहे कि ती 60 degri temprature पर्यंत या शेळीला काहीही होत नाही कारण यांची इम्युनिटी powe खुप स्ट्रॉंग व चांगली असल्यामुळे वजन वाढ एक वर्षां मध्ये 90 ते 100 kg वजन हे बोकडाचे व शेळीचे वजन हे 70 kg पर्यंत होते व आजारी पाडण्याचे प्रमाण पण कमी असते तसेच जे काही available चारा आहे ते खातात त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे आम्ही आफ्रिकान बोअर गोट आणि बोकड घेण्याचे ठरवले आणि ते आपण घेतले पण ही जात घेण्यासाठी आर्थिक budjet जास्त लगते बकरी ही 1500 रुपये kg प्रमाणे मिळते व बोकड हा 1000 रुपये प्रमाणे मिळतो. त्याप्रमाणे आम्ही 20 बोकड व 20 शेळ्या घेतल्या त्यांच्या वर्षभर सांभाळ करत असतांना आम्ही फार्म वरूनच विक्री चालू केली व एक वर्षात आम्ही 14 ते 15 लक्ष रुपयाचे बोकड विक्री करण्यात यशस्वी झालो आता आमच्या फार्म वर 50 प्राणी उपलब्ध आहे या एक वर्षात खर्च वजा जाता 11 लाख रुपये निवळ नफा शिल्लक राहिला. बांधिस्त शेळीपालन हे सकाळी एक तास, दुपारी एक तास आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत असे दिवसातून 3 तास काम करावे lagate आणि उरलेलेल्या वेळेत आपली परंपरिक शेतीतील कामे करू शकता तसेच यातुन लेंडी खत चांगल्या प्रमाणात मिळते ते आपल्या शेतात टाकून चांगली पिके घेऊ शकता मागील एक वर्षात आम्हाला 11 ट्रॅक्टर लेंडी खत मिळाले ते विक्री केले असते तर एक ट्रॅक्टर 8 हजार रुपये पर्यंत विक्री होते

