कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :-शिक्षण विभाग आणि भारत स्काऊट आणि गाईड नाशिक जिल्हा संस्थेच्या वतीने कप,बुलबुल, स्काऊट,गाईड विषयांच्या संदर्भातील वर्षभरातील अभ्यासक्रमाचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्यासाठी या उजळणी वर्ग आयोजीत केला होता.अतिशय उत्साही वातावरणात उजळणी वर्ग पार पडला.
ह्या उजळणी वर्गाचे उद्घाटन श्रीमती जे.आर.गुंजाळ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन.लोहकरे,पर्यवेक्षक महाले,भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा संस्थेचे मुख्य संघटक श्रीनिवास मुरकुटे,कविता वाघ यांनी केले.या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर उजळणी वर्गाचे मार्गदर्शक बद्रीनाथ रायते,सुनिल गांगुर्डे आधी उपस्थित होते.या उजळणी वर्गासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. स्काऊट गाईड अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंब, स्वयंशिस्त,स्वच्छता,बंधुभाव, परस्पर सहकार्य इत्यादी गणांच्या रुजवणुकी बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि आदर्श जबाबदार नागरिक घडविण्यासाठी स्काऊट गाईड शिक्षण काळाची गरज असल्याचे अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगततून व्यक्त केले. शिबिर समारोप प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एस.एन. लोहकरे,पर्यवेक्षक महाले,श्रीनिवास मुरकुटे,कविता वाघ, जिभाऊ शिंदे,बद्रीनाथ रायते,सुनील गांगुर्डे,शिरोळे,श्रावण साठे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गांगुर्डे यांनी केले आभार प्रदर्शन ज्येष्ठ स्काऊट शिक्षक शिरोळे यांनी केले.
