कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): तिसगाव, ता. चांदवड | संत परंपरेला मानाचा मुजरा

पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांची घेतली आमदार डॉ राहुल आहेर यांची भेट

तिसगाव, ता. चांदवड येथे संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी संस्थानचे विश्वस्त व यावर्षीचे विश्वगुरू श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील मानाच्या पालखीचे पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा पंढरपूर वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल दौलतराव आहेर यांनी सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.

यावेळी पंढरीची वारी, पालखी सोहळा आणि वारकरी उत्तम व्यवस्था व्यवस्थापन याविषयी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्र्यंबकेश्वर- पंढरपूर-त्र्यंबकेश्वर असा ४८ दिवसाचा पायी प्रवास व संत परंपरेची अखंड परंपरा जपत, भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सोहळ्याच्या भविष्यातील व्यवस्थेवर सकारात्मक संवाद आमदार डॉ राहुल आहेर यांनी साधला. व यावर्षी पालखी सोहळा प्रमुख म्हणून महाराजांनी अतिशय उत्तम केलेलं कार्य वारकऱ्यांची केलेली निस्वार्थ सेवा यावर समाधान व्यक्त केलं.

यावेळी ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे यांनीही संत निवृत्तीनाथ महाराज प्रतिमा व गाथा देत डॉ आहेर यांचाही सन्मान केला.

या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष श्री. संदीप काळे, मा.सरपंच श्री. कैलास खैरे, ह.भ.प. श्री. सौरभ महाराज जाधव, ह.भ.प. श्री. रमेश महाराज गांगुर्डे, तिसगाव सोसायटीचे मा. व्हा. चेअरमन श्री. धोंडीबा गांगुर्डे, तसेच श्री. अशोक बोराडे, श्री. संपत बोराडे, श्री. राजेंद्र बोराडे, श्री. विशाल बोराडे, श्री. राजेंद्र गांगुर्डे, श्री. संदीप गांगुर्डे, श्री. दत्तात्रय बच्छाव, श्री. गौरव गांगुर्डे, श्री. योगेश गांगुर्डे, श्री. अशोक गांगुर्डे, श्री. मनोज गांगुर्डे, श्री. साहेबराव निकम, श्री. विश्वनाथ सोनवणे, श्री. भाऊराव सोनवणे,ओम गांगुर्डे,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »