कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या उपकमाने साजरा

गरजु रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दिले ब्लॅकेंट व इतर साहित्य

चांदवडः चांदवड तालुक्यातील मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

चांदवड तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस एका नविन संकल्प मनात ठेवुन साजरा केला
यात उपजिल्हा रुग्णालयासाठी चादर ब्लॅकेट तसेच गर्भवती महिलांसाठी पाणी दुध गरम करण्यासाठी साहित्य त्याचप्रमाणे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

हे सर्वसाहित्य चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ, नवनाथ आव्हाड यांचेकडे सुपुर्द करण्यात आले यावेळी रुग्णालयातील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या

मनोज जरांगे पाटील यांची समाजाप्रती तसेच रुग्णांसाठी असलेली तळमळ कार्यकर्त्यांनी जपत त्यांचाच आदर्श घेऊन गरजु रुग्णांसाठी साहित्य दिल्याने या नविन उपक्रमाचं नागरींकामधुन स्वागत करण्यात आले

. मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतांना डॉ. आत्माराम कुंभार्डे, दिपक हांडगे, प्रकाश शेळके, सुनिल आण्णा सोनवणे, बाळासाहेब गाढे (फौजी ), सुरज भोसले, शहाजी पाटील ठाकरे, अरुण ठाकरे गणेश ठाकरे चेतन शेवाळे, जितु कोतवाल, शिवाजी ठाकरे, यांचेसह मराठा समाजाचे समन्वयक कार्यकर्ते उपस्थित होते

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »