काजीसांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने रंगमहाल ( होळकरवाडा ) येथे आज राजगादीचे पूजन व कॅमेरा पूजन करून छायाचित्रण दिन उत्साह साजरा करण्यात आला.
चांदवड तालुक्यातील व ग्रामीण क्षेत्रातून आलेले सर्व छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला. यावेळी पत्रकार सुनील आण्णा सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने बदलत्या युगातील डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वच व्यवसायिकांवर जे संकट आलेले आहे. त्या संकटाच्या दृष्टीने विचार मंथन करण्यात आले. आणि सर्व छायाचित्रकारांनी संघटित व्हावे अशी सर्वच ग्रामीण छायाचित्रकारांच्या वतीने मागणी करण्यात आली. त्या दृष्टीने चांदवड तालुका छायाचित्रकार संघटनेने आज हा कार्यक्रम आयोजित केला.
