उत्तम आवारे (काजीसांगवी) :१९ऑगस्ट २०२५ रोजी काजीसांगवी विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाजाचे आद्य कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले.
यानंतर जेष्ठ सभासद अँड दिनकरराव नरहरपंत ठाकरे यांच्या हस्ते समाज ध्वजाचे ध्वजपूजन करण्यात आले.व म.वि.प्र.चांदवड तालुका संचालक डॉ सयाजीराव गायकवाड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गितमंचणे सुंदर आवाजात राष्ट्रगीत ,राज्य गीत व समाज गीत सादर केले यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती पूजन ,छत्रपती शिवाजी महाराज पूजन तसेच कर्मवीर रावसाहेब थोरात व सर्वच कर्मवीरांचे पूजन केले यानंतर उपस्थितांचे विद्यालयाच्या गीतमंचाने सुंदर अशा आवाजात स्वागत गीत सादर केले. यावेळी समाज दिनानिमित्त उपस्थित तालुका संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब यांचा अँड. दिनकरराव नरहर पंत ठाकरे व उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री बाबुरावजी सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच श्री उदय जी यादराव ठाकरे उद्योजक आणि श्री. अरुण जगन्नाथ ठाकरे उप संचालक शिक्षण विभाग यांचाही डॉक्टर साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित श्री. अनिल शेठ अग्रवाल उद्योजक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यालयातील इयत्ता आठवी विद्यार्थिनी सुंदर भाषणे केले. यानंतर एस.एस.सी बॅच 2003 /2004 नव चेतना ग्रुप काजी सांगवी यांच्या हस्ते विद्यालयास विद्यार्थी उपयोगी महत्वपूर्ण पुस्तक देण्यात आली त्या ग्रुपचाही प्रमुख पाहुणे डॉ.साहेबांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आजच्या या समाज दिनानिमित्त विद्यालयात घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन श्री.अरुण जगन ठाकरे उपसंचालक शिक्षण विभाग व तालुका संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना लहान मोठ्या गटांचा गुणानुक्रम देण्यात आला काजी सांगवी गावाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे कर्मवीराप्रमाणे गावातील अनेक सभासद व देणगीदारांनी विद्यार्थ्यांसाठी आपल्या आई- वडिलांच्या स्मृती पित्यर्थ ठेवी ठेवलेल्या आहेत त्याचा विनियोग म्हणजे इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या मुला मुलींना व बारावी मध्ये प्रथम व्दितीय आलेल्या तसेच वेगवेगळ्या विषयांत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ठेवीवरील व्याजातून बक्षीस दिले गेली यावेळी श्री.उदय जी यादवराव ठाकरे व श्री.अरुण जगन ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा उत्तम मार्ग सांगितला आजच्या या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सन्माननीय सभासद स्कूल कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य सेवक संचालक श्री निंबाळकर सर तसेच शिक्षण प्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक पत्रकार बंधू, युवा कार्यकर्ता व मित्र मंडळ आणि मविप्रसंस्थेवर प्रेम करणारे आजी-माजी मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या या समाज दिनाचे सूत्रसंचालन श्री कुंभार्डे एम.पी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री शिर्के एस यु यांनी मानले. आजच्या या समाज दिनाचे सुंदर असे फलक लेखन कलाशिक्षक श्री प्रवीण ठाकरे यांनी केले. सुंदर अशी प्रतिमा मांडणी व रांगोळी सजावट यासाठी संपूर्ण काजीसांगवी शालेय परिवाराने परिश्रम घेतले आजचा हा समाज दिन काजी सांगवी विद्यालयात चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »