‌ कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यात गेल्या सप्ताहात रिपरिप पावसाने कांदा रोपे खराब होण्याच्या मार्गावर आसतांना दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असुन तालुक्यात विविध ठिकाणी कांदा लागवडीसाठी शेतकरी वाफे बनवून व लागवड जोरदार सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी टोमॅटो व मिरची भाजीपाला काढणी साठी मजुरांना सुगिचे दिवस आले आहेत कांदा लागवडीसाठी 12ते 14हजार व मजुरांना ने आण करण्याकरिता 2हाजार शेतकरयांना दावे लागत आहे अशे दतु मापारी या शेतकऱ्यांने सांगितले व कांदा लागवड करुन ही पाउस कमी प्रमाणात किंवा नाही आला तर केलेला खर्च मिळणेहीआवघड आहे तर बाजार भावावर आमची धुरा सांभाळली जाणार आहे चांदवड तालुक्यात विशेष करून मोठाले धरण किंवा जल साठा नसल्याने पोळ कांद्यावरच जास्त समाधान मानावें लागते व तेच आमचे नगदी पीक म्हणून संबोधले जाते अजुनही कांदा बाजार भाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Krushinews

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »