निमगव्हाण जि प शाळेत दंत चिकित्सा शिबिर संपन्न
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – चांदवड तालुक्यातील निमगव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉ . वैभव विठ्ठल साठे यांनी प्राथमिक शाळेतील सत्तेचाळीस व अंगणवाडीतील तीस विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करून तसेच दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले . कार्यक्रमासाठी सरपंच श्रीमती छायाताई गोधडे ,उपसरपंच नागेश ठोंबरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगंबर नारायण दरेकर, उपाध्यक्ष सागर जाधव ,दीपक दरेकर ज्ञानेश्वर गायकवाड ,बापू दरेकर , बापू जाधव,शरद जाधव, प्रवीण जाधव , शांताराम गायकवाड,सरला पवार , कैलास पवार, संदीप शिंदे ,सोनीताई गणेश( शिंदे) चौगुले ,अर्चना चव्हाण ,अर्चना शिंदे, सविता जाधव ,दिपाली दरेकर ग्राम अधिकारी देविदास शिंदे यांनी सहकार्य केले तसेच या प्रसंगी नशा मुक्ती ची शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री शांताराम हांडगे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती वृषालीताई जाधव( कदम) यांनी केले

