कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – राज्यस्तरीय थांग था चॅम्पियनशिप खेलो इंडिया सिलेक्शन ट्रायल 2025 अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 29 वी राज्यस्तरीय थांग था मार्शल आर्ट स्पर्धा दिनांक 19/20/21.9. 2025 रोजी अमरावती येथे घेण्यात आली होती. त्यामध्ये रोहित दळवी संचलित एम.टी.आय कराटे क्लासेस चांदवड येथील एकूण पाच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता व त्यामध्ये धनश्री सानप हिने सुवर्णपदक, आरोही शिंदे सुवर्णपदक, रुविल क्षीरसागर याने रोप्य पदक, तसेच कनक पवार हिने कांस्यपदक आराध्या वाघ.सहभाग प्रमाणपत्र पटकावून रोहित दळवी संचलित एम.टी.आय कराटे क्लास चांदवड यांचे नाव उंचाविण्याचे काम केले आहे. तसेच विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे धनश्री सानप व आरोही शिंदे सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविला असल्याने खेलो इंडिया तर्फे त्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे अशी माहिती चांदवड येथील क्लासचे संचालक रोहित दळवी यांनी दिली..
यावेळी एम.टी.आय प्रेसिडेंट अनिल जाधव सर योगेश देशमुख सर अमोल जाधव सर अमोल पवार सर यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच क्रीडा शिक्षक रोहित दळवी सरांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार केले.

यावेळी बोलताना.श्री मनोज शिंदे श्री अमित सानप श्री अमोल वाघ श्री मनोज पवार श्री विष्णू क्षीरसागर या पालकवर्गांनी एम.टी.आय क्लासेस तसेच रोहित दळवी यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांस पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »