श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे पारंपारिक पद्धतीने ‘ कोजागिरी पौर्णिमोत्सव साजरा…

सोमवार, दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२५

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे कोजागिरी पौर्णिमोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. गडावर कोजागिरी पौर्णिमेचे एक अनोखे आध्यात्मिक महत्त्व आहे. ” दक्ष प्रजापती यांच्या शापाने काळवंडलेल्या भगवान चंद्रदेव यांनी शापमुक्त होण्यासाठी श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे घोर तपश्चर्या केली. भगवान महादेव यांनी प्रगट होत चंद्रदेवास शापमुक्त केले. ते प्रेम पावन स्थान म्हणजे श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड होय. व शापमुक्त झाले तो दिवस म्हणजे ‘ कोजागिरी पौर्णिमा ‘ या दिवशी काळवंडलेला चंद्रास पूर्णरूपाने पांढराशुभ्र वर्ण प्राप्त झाला.” म्हणून श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे ‘ कोजागिरी पौर्णिमोत्सवास ‘ अनोखे आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सालाबादप्रमाणे स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात चंद्रेश्वर भक्त परिवाराच्या सहकार्याने कोजागिरी पौर्णिमोत्सवास उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य भाविकांनी सहभाग नोंदविला.

पत्रकार -

Translate »