सोनीसांगवी येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चा कॅम्प संपन्न.
सोनीसांगवी येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चा कॅम्प संपन्न.
सोनीसांगवी(प्रवीण ठाकरे) :सोनीसांगवी ग्रामपंचायत आयोजित सोनीसांगवी येथे स्पंदन डिजिटल सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आभा कार्ड चा कॅम्प आयोजीत केला होता. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चा फायदा हा सर्व सामान्य नागरिकांना होणार असून ५ लाखापर्यंतचा हॉस्पिटलचा खर्च शासन करणार आहेत.त्यासाठी सदरचे कार्ड काढणे गरजेचे आहे. या कॅम्प मध्ये सोनीसांगवीतील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून घेतले.याप्रसंगी सरपंच सौ. अलका ठाकरे ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण ठाकरे ,छाया ठाकरे ,सुमनबाई ठाकरे , सुमन जगताप ,निवृत्ती जगताप ,वैभव जगताप कोंड्याबाई गांगुर्डे बाबुराव ठाकरे,चेतन घंगाळे आदी उपस्थित होते