Rain Forecast: नाशिक आणि नगर जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीची इशारा..
Nashik Rain : राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. काही ठिकाणी ढगाळ आकाशामुळे उष्णतेचा प्रभाव कमी झाला आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला.विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमान ४१ अंशांच्या वर गेले आहे.मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा नाशिक व नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
नाशिक आणि नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.कोकणात उष्ण लाटेचा इशारा जारी आहे.रविवार (१९ मे) पर्यंत अंदमान बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
आज (१६ मे) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.नाशिक आणि नगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा आहे.
उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे.
वादळी पाऊस आणि गारपीट (यलो अलर्ट): नाशिक, नगर
वादळी पाऊस (यलो अलर्ट): रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली
उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट): पालघर, ठाणे, मुंबई, रायगड