मुलींच्या शिक्षणसाठी राज्य सरकारचा निर्णय; उच्च शिक्षण होणार मोफत, काय आहेत अटी, जाणून घ्या सविस्तर ..

बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे.आता मुलींना शिक्षणातील आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही.
या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) होणार आहे.कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडून द्यावी लागते. त्यामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना येत्या जुन पासून मोफत उच्यशिक्षण देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे उच्यशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे अशा पद्धतीचे प्रमाणपत्र विद्यार्थी यांना सादर करणे गरजेचे राहील व जेव्हा हे प्रमाणपत्र सादर केले जाईल त्यानंतर विद्यार्थिनींना या शुल्काचा संपूर्ण शंभर टक्के परतावा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे.सरकारच्या या निर्णयामध्ये सर्व प्रकारचे डिप्लोमा, पदवी शिक्षण, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.यामध्ये प्रामुख्याने 800 अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.या निर्णयात पदवीच्या BA, बीएससी, बीकॉम या कोर्सेसचा देखील समावेश असणार आहे.