चांदवड तालुक्यातील कोरोना काळापासून बंद असलेल्या बस चालू करण्यात याव्या-शिवसेना(ऊबाठा) जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर


आज लासलगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांनी चांदवड तालुक्यातील बंद पडलेल्या बसच्या बाबतीत लासलगाव आगार व्यवस्थापक यांना लवकरात लवकर बस चालू करण्या संदर्भात निवेदन दिले,व आगरप्रमुख यांनी लगेच उद्यापासून सांगवी मार्गे बस चालू करण्यासंदर्भात हिरवा कंदील दिला व उद्यापासून बस चालू होईल असे आश्वासन दिले,व उर्धुळ, देवरगाव मार्गे बस या सोमवार पासून चालू करण्यात येतील हे पण आश्वासन दिले,दिलेल्या निवेदनात लासलगांव वरुन सुटणारी चांदवड व्हाया काजी सांगवी मार्गी जाणारी बस सकाळी १०-०० वाजता व चांदवड वरुन येणारी कांजीसांगवी मार्गी लासलगांव जाणारी बस वेळ सकाळी ११-०० वाजता तसेच चांदवड वरुन उर्थुळ मार्गी लासलगांव जाणारी बस दुपारी १२-१५ वाजता व चांदवड वरुन देवरगांव मार्गे लासलगाव जाणारी बस ९-०० वाजता जाणा-या बस या कोराना काळापासून बंद करण्यात आलेल्या होत्या फेरी बस बंद असल्यामुळे लासलगांव व चांदवड येथे जाणारे विद्यार्थी तसेच नागरिक यांची बस बंद असल्याकारणाने अतोनात हाल होत होते व खाजगी वाहनाने अपघात व वाईट घटना घडू शकतात,असे निवेदनात म्हणण्यात आलं होतं,,,तरी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या,याप्रसंगी शिवसेना(उबाठा) लासलगाव तालुकाप्रमुख शिवा आप्पा सुराशे,तालुका संघटक केशवनाना ठाकरे,युवासेना ता.अधिकारी घमाजी राजे सोनवणे,गट संघटक ज्ञानेश्वर आवारे,गणप्रमुख साहेबराव चव्हाण,विवेक ठाकरे,सुरेश सोनवणे व विद्यार्थी उपस्थित होते.

आगार व्यवस्थापकांना निवेदन देताना शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर व विदयार्थी

पत्रकार -

Translate »