Ladki Bahin Scheme : लाडकी बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार तिसरा हप्ता..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे आता वितरण केले जाणार असून. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबर रोजी वितरीत केला जाणार आहे. यामुळे लाभार्थी महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळनार आहेत.

महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या तिसऱ्या टप्प्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबर महिन्यापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र महिलांना लाभ वितरीत केला जाणार आहे. अनेक महिलांना अर्जादरम्यान झालेल्या चुकांमुळे या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात अशा सर्व महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तटकरे यांच्या मते, या तिसऱ्या टप्प्यात सुमारे 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी अनुक्रमे 1500 रुपये प्रत्येकी, असे एकूण 3000 रुपये देण्यात आले आहेत. या योजनेचा शुभारंभ पुणे येथे एका भव्य कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या निमित्ताने करण्यात आला होता. त्यानंतर नागपूर येथे दुसरा कार्यक्रम आयोजित करून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. आता, या योजनेचा तिसरा टप्पा रायगड येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबर महिन्यासाठीचा हप्ता वितरीत केला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. या तारखेपर्यंत आपला अर्ज सादर करून आपणही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पत्रकार -

Translate »