Kia ची धमाकेदार एंट्री! Kia कडून ‘या’ 2 नवीन कार मार्केटमध्ये होणार लाँच,जाणून घ्या फीचर्ससह किंमत

3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, किआ आपल्या कार लाइनअपमध्ये दोन नवीन गाड्यांची भर टाकणार आहे.सणांच्या हंगामात किआ आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन कार लॉन्च करणार आहे. SUV बरोबर, MPV सेगमेंटमधील मागणी वाढत असल्याने किआच्या या नवीन कारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किया कार्निव्हल (Kia Carnival)

किआ कार्निव्हल MPV ची नवीन जनरेशन लॉन्च होण्याची तारीख 3 ऑक्टोबर ठरली आहे. या कारमध्ये 6 आणि 7 सीटच्या पर्यायांचा समावेश असेल.

किया ईव्ही 9 (Kia EV9)

Kia EV9, एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही, 3 ऑक्टोबरला भारतीय बाजारात दाखल होत आहे. ही कार 6 ते 7 जणांना बसवू शकते आणि अनेक उत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज आहे. ही कार प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल आणि कंपनी ही कार भारतात सीबीयू म्हणून आणत आहे.दोन्ही कारच्या अचूक किंमती कंपनी लाँचच्या वेळी जाहीर करेल.

पण मार्केटमधील इतर गाड्यांच्या किंमती पाहता, कार्निव्हलची किंमत 50 लाख रुपये आणि EV9 ची किंमत 80 लाख रुपये इतकी असू शकते.

पत्रकार -

Translate »