महिनाभर चहा न पिल्याने तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात.भारतात जवळपास ९९ टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते.महिनाभर चहा सोडून दिल्यास शरीरात आरोग्यदायी बदल होऊ शकतात. 30 दिवसांसाठी कॅफिनचे सेवन कमी केल्याने चांगली झोप, कमी चिंता आणि पाचक आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते.
अनेक लोक चहा पिणे आवडतात आणि मर्यादित प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जात नाही. परंतु, जर आपण दिवसातून चार-पाच वेळा जास्त प्रमाणात चहा प्यायला तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिन हे आपल्या शरीरातील अनेक प्रक्रियांवर परिणाम करू शकतात. म्हणूनच, चहा पिणे सोडल्याने आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. चला तर मग, चहा सोडल्याने आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात, हे जाणून घेऊया.
झोप सुधारते: चहात कॅफिन असते जे झोपला खंड देते. एक महिना चहा न पिल्याने तुमची झोप चांगली होऊ शकते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
पचन सुधारते: चहात असलेले टॅनिन पचनक्रियावर परिणाम करू शकते. चहा सोडल्याने तुमचे पचन सुधारू शकते आणि गॅस, मळमळ यासारखे त्रास कमी होऊ शकतात.
रक्तदाब नियंत्रणात राहतो: चहा रक्तदाब वाढवू शकतो. चहा सोडल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
वजन कमी होण्यास मदत होते: चहा आणि कॉफीमध्ये असलेली साखर आणि कॅफिन वजन वाढवू शकतात. चहा सोडल्याने वजन कमी करण्यात मदत होऊ शकते.
शरीरातील पाण्याची पातळी वाढू शकते: कॅफिन शरीरातील पाणी बाहेर काढते. चहा सोडल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढू शकते.
टीप : ही माहिती सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.