Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी मिळाली,ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा..

लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार आहे. काही महील्यांच्या खात्यात थेट ३००० जमा झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्ताचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस राज्यातील महायुती सरकारचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार

लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हफ्त्याचे ३००० रुपये आधीच देण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपयेही तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. बाकीचे पैसे, म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे, १० ऑक्टोबरच्या आधी तुमच्या खात्यात जमा होतील, याची खात्री असू द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदिती तटकरे यांच्याशी बोलून या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते.काही लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळाले असून याची प्रक्रिया सुरू असून, ज्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत, त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना जुलैपासून दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. कागदपत्रांच्या चुका किंवा अर्ज भरताना झालेल्या चूकांमुळे अनेक महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही, त्यांना पैसे मिळणार नाहीत. सरकारने सर्व महिलांना बँक खाते आणि आधार क्रमांक लवकर जोडण्याचे आवाहन केले आहे.बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे.

पत्रकार -

Translate »