Onion Market: बाजारात नवीन कांद्याची एन्ट्री! मंचर बाजार समितीत नवीन कांद्याला कसा मिळतोय दर..
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाने नवा उच्चांक गाठला आहे. दहा किलो कांद्याला तब्बल ७०० रुपयांचा दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, जुन्या कांद्याच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. मात्र जुन्या कांद्याला विशेष मागणी राहिल्याने त्याचे दर स्थिर आणि चांगले आहेत.
मंचर बाजारात यंदा ३,४६५ पिशव्या जुन्या कांद्याच्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यातील उच्च प्रतीच्या कांद्याला दहा किलोला ७०० रुपये असा दर मिळाला, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला आहे. दरम्यान, नव्या कांद्याचीही साधारणपणे ५०० पिशव्या विक्रीसाठी आल्या आहेत, परंतु या कांद्याला जुन्या कांद्याच्या तुलनेत कमी दर मिळत आहेत.
कांद्याचे दर पुढीलप्रमाणे मिळाले आहेत:
सुपर लॉट १ नंबर गोळ्या कांदा: दर ६५० ते ७०० रुपये प्रति १० किलो
सुपर गोळे कांदा १ नंबर: दर ६३० ते ६५० रुपये प्रति १० किलो
सुपर मीडियम २ नंबर कांदा: दर ५५० ते ६३० रुपये प्रति १० किलो
गोल्टी कांदा: दर ३५० ते ४५० रुपये प्रति १० किलो
बदला कांदा: दर २५० ते ४०० रुपये प्रति १० किलो
नवीन कांद्याचे दर मात्र थोडे कमी आहेत:
सुपर गोळे कांदा १ नंबर: दर ५२० ते ५५० रुपये प्रति १० किलो
सुपर मीडियम २ नंबर कांदा: दर ३५० ते ५२० रुपये प्रति १० किलो
गोल्टी कांदा: दर २०० ते ३५० रुपये प्रति १० किलो
बदला कांदा: दर ५० ते १३० रुपये प्रति १० किलो
मंचर बाजार समितीत कांद्याला मिळणारे हे दर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. जुना कांदा संपण्याच्या स्थितीत आहे, मात्र अजूनही बाजारात त्याची मागणी कायम आहे. विशेषतः उच्च प्रतीचा जुना कांदा जास्त दराने विकला गेला आहे. नवीन कांद्याला बाजारभाव मिळत असला तरी, तो जुन्या कांद्याच्या तुलनेत काही प्रमाणात कमी आहे.
या वर्षी कमी झालेल्या उत्पादनामुळे आणि मागणी वाढल्यामुळे जुन्या कांद्याचे दर वाढलेले दिसत आहेत.