MHT CET : सीईटी सेलतर्फे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर..

नाशिक : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कृषी शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य आहे.

मार्च २०२५ मधील परीक्षा वेळापत्रक

मार्च महिन्यातील परीक्षांची सुरुवात १६ मार्च २०२५ पासून होणार आहे. विविध अभ्यासक्रमांसाठीच्या परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:

१६ मार्च: एम.एड. (M.Ed.), एम.पीएड. (M.P.Ed.)

१७ ते १९ मार्च: एमबीए (MBA), एमएमएस (MMS)

२३ मार्च: एमसीए (MCA)

२४ व २५ मार्च: बीएड (B.Ed.)

२७ मार्च: एमएचएमसीटी (MHMCT), बीएड.

२८ मार्च: एमएचएमसीटी (इंटिग्रेटेड)

२८ मार्च: बीएड-एमएड (इंटिग्रेटेड)

२९ मार्च: बी.डिझाइन (B.Design)

एप्रिल २०२५ मधील परीक्षा वेळापत्रक

एप्रिल महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

१ ते ३ एप्रिल: बीबीए (BBA), बीसीए (BCA), बीबीएम (BBM), बीएमएम (BMM)

४ एप्रिल: विधी अभ्यासक्रमांसाठी परीक्षा (Law)

५ एप्रिल: ए. ए. सी. (AAC)

७ व ८ एप्रिल: नर्सिंग अभ्यासक्रम (Nursing)

८ एप्रिल: डीएपीएन (DPN), पीएचएन (PHN)

९ ते १७ एप्रिल: एमएचटी-सीईटी (MHT-CET) पीसीबी गट (PCB) (१० व १४ एप्रिल वगळता)

१९ ते २७ एप्रिल: एमएचटी-सीईटी (MHT-CET) पीसीएम गट (PCM) (२४ एप्रिल वगळता)

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा ही एक अनिवार्य पायरी आहे. या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरवले जाते. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, कृषी, नर्सिंग अशा विविध शाखांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध

सीईटी कक्षाने  www.mahacet.org  या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाच्या अनुषंगाने आपले अभ्यास नियोजन करावे व वेळेत परीक्षा फॉर्म भरण्याचे सुनिश्चित करावे.

विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने वेळेचे भान ठेवून तयारी करणे गरजेचे आहे.

पत्रकार -

Translate »