मुलगा होत नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या

KNN :नळदुर्ग (जि. धाराशिव) : मुलगा

होत नसल्याच्या रागातून पत्नीची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना काटगाव (ता. तुळजापूर) येथे गुरुवारी घडली. पोलिसांनी पतीस ताब्यात घेऊन शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही, असे म्हणत धनंजय भारत माळी (३५) याने गुरुवारी तिन्ही मुली शाळेत गेलेल्या असताना पत्नी गोजर माळी (२८) यांचे डोके भिंतीवर आदळून जखमी केले. यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून ठार मारले. यानंतर त्याने घराबाहेर पडत मी पत्नीचा खून केला, असे लोकांना सांगत सुटला.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »