वाकी विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

वाकी विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक तालुका चांदवड या विद्यालयात ग्रामपंचायत वाकी बुद्रुक च्या विद्यमान सरपंच सौ. छायाताई अहिरे यांच्या हस्ते शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती पाहणी करून विद्यार्थ्यांना शाब्बासकी व प्रोत्साहन दिले. सरपंच सौ. छायाताई अहिरे म्हणाल्या विज्ञान हा एक जीवनाचा अविभाज्य घटक असून विज्ञानाने सृजनशीलता, निरीक्षण शक्ती,नवनिर्मितीचा ध्यास या घटकांचा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल होते यातूनच शास्त्रज्ञ निर्माण होतात. याच विद्यार्थ्यांमध्ये भविष्याचे शास्त्रज्ञ लपलेले आहे अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा कल्पकतेला प्रोत्साहन मिळते. विज्ञान प्रदर्शनासाठी उपसरपंच संदीप सेठ कोकणे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पोळ, लहानु कोकणे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव भांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच जि प शाळेचे विद्यार्थी सर्व शिक्षक, पालक यांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाकी विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यभान मापारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश पवार, बळवंत शिंदे, प्रतिभा पाटील, गोपीचंद वाघ यांनी परिश्रम घेतले. रमेश पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

पत्रकार -

Translate »