होळकर वाडा( रंग महाल )होत आहे पर्यटकांचे केंद्रस्थान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
होळकर वाडा( रंग महाल )होत आहे पर्यटकांचे केंद्रस्थान.
उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी असलेले चांदवड मल्हारगड, हे महाराष्ट्रातील होळकर प्रेमींनी हा होळकर वाडा बघण्यासाठी जरूर चांदवड नगरीला भेट द्यावी = श्री समाधान बागल. (इतिहास अभ्यासक व समाजसेवक ) चांदवड पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी वर्षानिमित्तनिमित्त महाराष्ट्रातुन होळकर प्रेमी हे उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखणे जाणारी चांदवड होळकर नगरीत येत आहे. आणि या उपराजधानीमधील ऐतिहासिक वास्तू होळकर वाडा (रंगमहाल ) बघण्यासाठी होळकर प्रेमाची गर्दी वाढायला सुरुवात झालीआहेत. यातच नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था ही मुलांना अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास समजावा. आणि राज्य सरकारने ही वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती तीनशे वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त त्रिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. नासिक येथून शैक्षणिक संस्था हा होळकर वाडा रंगमहाल बघण्यासाठी येत आहे. भरपूर संस्था या मुलांना रंगमहाल दाखवून गेल्या आणि मुलांना त्याचा इतिहास जागृत करण्यासाठी या इतिहासाची माहिती घेऊन गेली आहेत *नासिक येथील स्वामी विवेकानंद सोसायटीचे श्रीमान त्रिबंकलाल जयरामभाई चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी,नविन सिडको,नाशिक-9 शाळा*

शुक्रवार दि.०३.०९.२०२४ रोजी वियालयातील इयता ८ वी च्या विदयार्थ्यांना होळकर वाडा (रंगमहाल )
क्षेत्रभेट साठी मुख्याध्यापिका मा.उज्वला माळी
शिक्षिका -अलका चंद्रात्रे, चित्रा येवले, प्रिया पवार, जितेंद्र गायकवाड सर यांनी या रंगमालास भेट दिली सकाळी नऊ वाजेपासून बारा वाजेपर्यंत या होळकर वाड्याची माहिती नासिक जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते श्री समाधान बागल यांनी या विद्यार्थ्यांना चांदवड च्या बाजूची परिसराची व होळकर वाड्याची माहिती दिली. आत्ताची चंद्रेश्वरी गड अगोदरचे मल्हारगड, त्यावरील असलेले होळकर कालीन टाकसाळ चांदवडी रुपया, सातपुडा रांगेतील असलेल्या टेहळणी केंद्राची तसेच नाशिक जिल्ह्यातील होळकर यांचा इतिहास व पाऊलखुणा ऐतिहासिक बाराव या संदर्भात माहिती दिली.
संस्थेचे शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी यांनी ऐतिहासिक माहिती प्राप्त झाल्या कारणाने श्री समाधान बागल सर यांचे मानले.
चांदवड चा इतिहास हा उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखला जाणारी होळकर नगरी चांदवड या इतिहासाची जागृती व्हावी यासाठी शैक्षणिक संस्थेने या होळकर वाड्यात भेट द्यावी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जाणून घ्यावा. आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवास तीनशे वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने हे त्रीशताब्दी वर्ष भव्य दिव्य आणि नाशिक जिल्ह्याचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहित व्हावा या होळकर नगरीला भेट द्यावी असे आव्हान श्री समाधान बागल यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील होळकर प्रेमींना केला आहे.

पत्रकार -

Translate »