यशस्वी सापळा कारवाई: मंडळ अधिकारी ₹2000 लाच घेताना रंगेहाथ पकडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) | 13 फेब्रुवारी 2025

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी यशस्वी सापळा रचून मंडळ अधिकारी प्रविण गणपत प्रसाद (वय 57, वर्ग-3) यांना ₹2000/- लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

प्रकरणाचा तपशील:

🔹 तक्रारदार: 39 वर्षीय पुरुष
🔹 आरोपी: प्रविण गणपत प्रसाद, व्यवसाय- नोकरी, मंडळ अधिकारी
🔹 लाच मागणी रक्कम: ₹2000/-
🔹 तडजोडीनंतरची रक्कम: ₹2000/-
🔹 स्वीकारलेली व हस्तगत रक्कम: ₹2000/-
🔹 पडताळणी दिनांक: 13 फेब्रुवारी 2025
🔹 सापळा कारवाई दिनांक: 13 फेब्रुवारी 2025

घटनेचा संक्षिप्त आढावा:

चांदवड तालुक्यातील काळखोडे गावातील एका नागरिकाने जमिनीसंदर्भात 7/12 नोंदणीसाठी अर्ज सादर केला होता. संबंधित अर्ज मंजुरीसाठी मंडळ अधिकारी प्रविण गणपत प्रसाद यांच्याकडे पाठवण्यात आला. यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ₹2000/- लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने यासंदर्भात 12 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली. ठरलेल्या सापळा कारवाईदरम्यान 13 फेब्रुवारी 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यामध्ये मंडळ अधिकारी प्रविण प्रसाद यांनी लाचेची मागणी करून ₹2000/- स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा व तपास अधिकारी:

सक्षम अधिकारी: मा. जिल्हाधिकारी, नाशिक
सापळा अधिकारी / तपास अधिकारी:
श्री. अमोल सदाशिव वालझाडे – पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक:
▶ पोहवा/संदीप हांडगे
▶ पोना/सुरेश चव्हाण
▶ चापोहवा/विनोद पवार
मार्गदर्शक अधिकारी:
मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र
📞 मोबाईल: 9371957391

नागरिकांना आवाहन:

लाचलुचपत विरोधी कायद्यांतर्गत नागरिकांनी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा खाजगी व्यक्तीने शासकीय कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क साधावा.

चांदवड तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा हा प्रकार समोर आल्यानंतर तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता निर्माण झाली आहे.

📞 दूरध्वनी क्रमांक:
🔸 0256-2234020
🔸 0253-2578230
टोल फ्री क्रमांक: 1064

🔴 भ्रष्टाचार रोखा, जागरूक राहा!

पत्रकार -

Translate »