स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात दिघवद विद्यालयाचे यश.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -नासिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद शाळेने पायोनियरिंग,फूड प्लाझा,तंबू सजावट या स्पर्धेमध्ये यश संपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन,बंधुभाव, संघभावना,स्वच्छता इत्यादी गुण वाढीस लागावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला,कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिनांक 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान नासिक भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काकासाहेब नगर,रानवड या ठिकाणी जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यास जिल्हाभरातून अनेक शाळा सहभागी झालेल्या होत्या. ह्या मेळाव्यात जिल्हा संस्थेकडून अनेक स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या.त्यामध्ये तंबू सजावट,पायोनियरिंग,फूड प्लाझा, शोभायात्रा,शारीरिक कसरती,विस्तीर्ण खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. या स्पर्धांमध्ये शाळेने पायोनियरिंग प्रोजेक्ट व फूड प्लाझा मध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रथम क्रमांक व तंबू सजावटीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. मेळाव्या दरम्यान अनेक मान्यवरांनी शाळेने बनविलेल्या गॅजेट्स तसेच तंबू व पायोनियरिंग प्रोजेक्ट ला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या मेळाव्यास शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,संस्थेचे विद्यमान संचालक तसेच शिक्षक सदाशिव गांगुर्डे,उपशिक्षक किशोर गांगुर्डे,शशिकांत पाटील सागर गांगुर्डे,धनंजय गांगुर्डे तसेच पालक एकनाथ गांगुर्डे,आनंदा पवार,पुंडलिक भोईटे,ज्ञानेश्वर ठाकरे, बबन गांगुर्डे,शिवाजी गांगुर्डे भाऊराव गांगुर्डे, गणेश निंबाळकर, दशरथ ठोंबरे मीनानाथ निखाडे,युवराज चव्हाण आदींनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनविलेले गॅझेट्स,तंबू,पायोनियरिंग मधील डायनिंग टेबल,मंकी ब्रिज यांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार भास्कर भगरे सर, आमदार दिलीप बनकर मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस नितीन ठाकरे,स्काऊट जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे,गाईड जिल्हा संघटक कविता वाघ,जिल्हा मुख्य प्रशिक्षण आयुक्त नवनाथ वाकचौरे जयदत्त होळकर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार भगरे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन युनिट मधील विद्यार्थी तसेच स्काऊट शिक्षक यांचा गौरव करण्यात आला.युनिटमध्ये आदित्य खांगळ,यश गांगुर्डे,अनिकेत गांगुर्डे,सार्थक गांगुर्डे,सार्थक भोयटे,कृष्णा गांगुर्डे,धनराज ठाकरे,करण पवार,गौरव ठाकरे,मनोज मापारी इत्यादी मुले सहभागी होती.या सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट शिक्षक सुनिल गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे साहेबराव गांगुर्डे,नानाभाऊ गांगुर्डे, दत्तात्रय गांगुर्डे, विठ्ठल गांगुर्डे,बनुबाई गागरे,अशोक ठाकरे,निवृत्ती मापारी,महेश गांगुर्डे संस्थेचे सर्व संचालक यांनी विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी पर्यवेक्षक इंद्रभान देवरे उपशिक्षक सुरेश सोनवणे,अर्जुन गांगुर्डे,प्रभाकर पेंढारी,अमोल ठोंबरे,संदीप पाटील,गणेश गांगुर्डे,सुनील शुभम हांडगे,सुनिता राठोड रेणुका कानडे,कलुबाई साबळे,हर्षाली भामरे,रमा नगराळे,जयश्री पाटील आदींनी सहकार्य केले.



