दिघवद विद्यालयात शिवजन्मोत्सव आनंदात साजरा..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच किशोर गांगुर्डे,सुनील गांगुर्डे, सुनील चंदनशिव या शिक्षकांच्या संकल्पनेतून इ. 8वी चे विद्यार्थी शुभम मापारी,सार्थक मापारी,सोहम जाधव,युवराज नवले,प्रतीक गाढे,कृष्णा चव्हाण,गौरव गांगुर्डे यांनी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली.या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी संचालक शिक्षक सदाशिव गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर धर्मयोद्धा मंच व समस्त ग्रामस्थ दिघवद यांचे वतीने आयोजित शिवजन्मोत्सवात विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राजांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे,बनुबाई गागरे,दिघवद गावचे सरपंच रावसाहेब गांगुर्डे,चेअरमन पोपटराव गांगुर्डे,धर्मयोद्धा मंचचे शंकर रसाळ,सागर गांगुर्डे,सुनील मापारी ग्रामस्थ नरहरी अण्णा गांगुर्डे ,बंडू देवरे,दिलीप मापारी,अमर मापारी,उत्तमराव झाल्टे पुंडलिक गांगुर्डे,नरेश भालेकर,मंगेश गांगुर्डे,योगेश गांगुर्डे,दिलीप मापारी, राजाराम मापारी,नामदेव मापारी,उत्तम मापारी,नाहीद शेख, सुनील गांगुर्डे,रमेश मापारी,लक्ष्मण काळे, अविनाश बारगळ,अनिल तळेकर. आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.धर्मयोद्धा मंचच्या वतीने फौजी शंकर रसाळ यांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्राच्या उच्चारणाबरोबरच विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे आचरण करण्याचे आव्हान केले.तसेच सर्वांचे आभार मानले. तसेच धर्मयोद्धा मंचच्या वतीने वकृत्व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संध्याकाळी महाराजांची भव्य मिरवणूक काढून शिवभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,जि.प.प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी तसेच दिघवद ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळी उपस्थित होते.



