दिघवद येथे मोठ्या पडद्यावर ‘छावा’ चित्रपटाचे भव्य प्रदर्शन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद येथील सेवानिवृत्त शिक्षक तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तज्ञ संचालक राजेंद्र गांगुर्डे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या उद्देशाने मोठ्या पडद्यावर छावा चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले, ही प्रत्येक मराठ्याची अभिमानाची बाब आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आपल्या मातीतील पराक्रमी इतिहास सर्वांना माहित असावा, या भावनेतून गावातील हनुमान मंदिरासमोर मोठ्या पडद्यावर या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमासाठी परिसरातील असंख्य नागरिक, स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना इतिहासाची जाणीव होण्यास मदत झाली आहे.

राजेंद्र गांगुर्डे यांच्या ऐतिहासिक जाणीवेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पत्रकार -

Translate »