काजीसांगवी: उत्तम आवारे

सोनीसांगवी येथील प्राथमिक शाळेत प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. अलका ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर द्वीप प्रज्वलन सौ. इंदुमती ठाकरे, शालेय समिती अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष श्री. किरण ठाकरे, भारतीय सेनेतील सीआरपीएफ जवान श्री. संतोष ठाकरे, मुख्याध्यापक श्री. संदीप जाधव, शिक्षिका सौ. गितांजली कोंडसौ. श्रध्दा जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. संदीप जाधव यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळेसाठी सभामंडप आणि स्टेज उपलब्ध झाल्यामुळे यंदाचे स्नेहसंमेलन भव्य स्वरूपात आयोजित करता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप बनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच श्री. प्रविण ठाकरे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना व्यासपीठ

पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले. पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच पालकांनी विशेष मेहनत घेतली. या प्रसंगी ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यामुळे संमेलनाला मोठा प्रतिसाद लाभला.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »