होळकर वाडा( रंग महाल)चांदवड येथे मल्हार जन्मोत्सव साजरा..


नर्मदा गोदावरी च्या तीर्थने जलाअभिषेक…
श्री समाधान बागल यांच्या हस्ते अभिषेक..


काजीसांगवीः उत्तम आवारे पत्रकार
16मार्च दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव गेल्या दोन-तीन वर्षापासून होळकर वाडा चांदवड येथे साजरा केला जात आहे. यावर्षीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी
वर्ष व मल्हार होळकर यांचा जन्मोत्सव पुढील थोड्या दिवसात संयुक्त जन्मोत्सव होणार आहे. परंतु आज तिथीनुसार मल्हारराव होळकर यांच्या नर्मदा गोदावरी यांच्या तीर्थ जलाने जलाभिषेक करून. मातोश्रींच्या मूर्तीला पुष्पहार घालून हा जन्मोत्सव वैदिक पद्धतीने साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे ही होळकर नगरी
मल्हारराव होळकरयांनी वसवलेली आहे.या ठिकाणी मल्हार गड म्हणून आजचा चंद्रेश्वरी म्हणूनप्रसिद्ध आहे.त्याकाळी मल्हार गडावरती टाकसाळ होती. चांदवडी रुपया हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध होता.
रोजी चांदवड रंगमहाल या ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर जयंती सोहळा पार पडला यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री समाधानजी बागल, भूषण जाधव यांच्या हस्ते सकाळी सूर्योदयाच्या वेळी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुतळ्याची पूजा व अभिषेक करण्यात आला या अभिषेकासाठी अमोल दिक्षित गुरुजी यांनी नर्मदा गोदावरी नद्यांचे पाणी, आणून त्या ठिकाणी विधी करण्यात आला.याप्रसंगी समाधान बागलजी यांनी बोलताना सांगितले की सुभेदार मल्हारराव होळकर हे एक युगपुरुष होते आणि त्यांनी मराठी माणसाचं नाव अगदी देशाच्या पलीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा पर्यंत नेऊन धडकवले आणि म्हणून मल्हारराव होळकर हा एक प्रेरणेचा स्रोत आहे एखाद्या सामान्य घरातून येऊन असामान्य कीर्ती करणाऱ्या दिग्गजामध्ये मल्हाराव होळकर हा एक सर्वोत्तम आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगी बांधून आणि महाराष्ट्राच्याही बाहेर निघून किंबहुना आजच्या भारत देशाच्या बाहेर असणाऱ्या अटक सारखे ठिकाण पर्यंत जाऊन धडक मारण्यासाठी त्यांनी आपल्या सेनेचे नेतृत्व केलं एवढेच नाही तर पानिपतच्या युद्धामध्ये सैन्याची आणि मराठा माणसाची हानी झाल्यानंतर सुद्धा मल्हारराव होळकरांनी तेवढ्याच ताकतीने सर्व मराठा साम्राज्य परत एकदा उभा करून दिलं असे मल्हार होळकर यांची जयंती फक्त एका होळ मुरूम मध्ये का व्हावी तर मल्हारराव होळकरांचा आदर्श या मातीच्या कणाकणात आहे आणि म्हणून जिथे जिथे मल्हारराव होळकरांचे पाय पडले की प्रत्येक जागा हिंदूमय होत गेली. अगदी दिल्लीपासून ते अटक पर्यंत असं खूप मोठे उदाहरण आपण घेऊ शकतो आणि म्हणून मल्हार राव होळकर यांची जयंती ही प्रत्येक होळकर किल्ल्यावर प्रत्येक होळकरांच्या वाड्यावर जिथे तिथे होळकरांचा वाडा असेल त्या प्रत्येक ठिकाणी ही जल्लोषात व्हायला हवी ज्याप्रमाणे मातोश्री अहिल्यादेवींची जयंती आपण साजरी करतो त्याचप्रमाणे मल्हारराव होळकर यांचीही जयंती ही संपूर्ण हिंदुस्थानात साजरी झाली पाहिजे कारण नुसता मल्हारा या नाव ऐकल्यानंतर राजे गाद्या सोडून पळत होते आणि सैन्य नुसतं नाव ऐकून माघारी पळत होतं एवढी जरब ज्या माणसाची होती पण ती जरब होती सत्यासाठी , धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी आणि म्हणून असे प्रत्येक मराठी माणसासाठी आदरणीय असलेलं नेतृत्व या भारत देशासाठी एक मुलुख मैदानी तोफ म्हणून एक महापराक्रमी योद्धा म्हणून आणि त्याचबरोबर या भारत वर्षाला हिंदूमय ठेवण्यासाठी काम करणाऱ्या एका महान भारतभूमीच्या लेकाची जयंती ही संपूर्ण हिंदुस्थानात साजरी होणं गरजेचं आहे

अखंड भारताला आपल्या तलवारीच्या जोरावर हालवून सोडणारे , फक्त मल्हार आया म्हणताच हजारोंच सैन्य माघारी फिरायचे
आणि एवढी विरता असुनही आपल्या सुनेला मुलाप्रमाणे सांभाळुन ह्या भारत वर्षासाठी एक अहिल्यादेवी नावाच सुवर्ण पान घडवणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती
ज्याप्रमाणे होळ मुरुम येथे हा उत्सव साजरा करतात तशीच आम्ही आज चांदवडला रंगमहालात पुजा केली कारण चांदवड ही होळकर राज्याची उपराजधानी आहे व आजचा शुभदिनी अखंड भारतात ही जयंती व्हावी व सुभेदारांची किर्ती परत सगळ्यांना माहीत व्हावी ह्यासाठी आज हे स्थळ निवडले आहे कारण जिथे जिथे सुभेदारांचे पाय लागले ती प्रत्येक जागा हिंदुमय होत गेली हे आपण विसरता कामा नये.

पत्रकार -

Translate »