कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): लग्न किंवा साखरपुडा म्हटलं पाहुण्यांचा मानपान नवदांपत्याची रेल झेल नेहमीच पाहायला मिळते परंतु चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे अशाच एक शेळके आणि निकम नवदांपत्यांचा साखरपुड्याच्या कार्यक्रमातून विविध कृषी योजनांची माहिती उपस्थित पाहुणे मंडळींना ऐकायला मिळाली .
तालुक्यातील देवरगाव येथील संतोष कारभारी निकम यांची कन्या शुभांगी व काळखोडे येथील शरद संपत शेळके यांचे चिरंजीव अक्षय हे दोन्ही नवदांपत्य प्रगतशील शेतकरी कुटुंबातील असून इंजिनिअरिंग पदवी घेऊन सध्या पुणे येथे नोकरीसाठी कार्यरत आहे या दोन्ही नवदांपत्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात देवरगाव येथे आयोजित करण्यात आला परंतु या दोन्ही कुटुंबीयांची नाळ शेतीशी जोडली असल्याने कार्यक्रमासाठी जमलेल्या पाहुणेमंडळींनाही विविध शेती विषयक योजनांची माहिती होणे गरजेचे असल्याने तालुक्यातील शेतकरी नेते व प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी पाहुणे म्हणून आलेले चांदवड तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे व कृषी सहाय्यक सोमनाथ जाधव यांना कार्यक्रमाच्या प्रथमता शेतकरी योजनांची माहिती सांगण्याचा हट्ट केला तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी जराही विलंब न करता उपस्थित पाहुण्यांना सुमारे एक तास विविध योजनांची व शेती पोर्टल विषयी सविस्तर माहिती दिली तसेच फार्मर आयडी लवकरात लवकर काढण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले या दोन्ही अधिकाऱ्यांचे दोन्ही परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले नंतर साखरपुड्याच्या विधीवत पूजेला सुरुवात करण्यात आली असा आगळावेगळा कार्यक्रमची तालुक्यामध्ये जोरदार चर्चा होतआहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »