सोनीसांगवी येथे खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): सोनीसांगवी येथे खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेत शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी ,बियाणे बीज प्रक्रिया, सीआरए फळबाग लागवड, तंत्रज्ञान हुमणी कीड प्रतिबंधक, लाईट ट्रॅप तंत्रज्ञान, कांदा रोपे तयार गादीवाफा तयार करणे, या विषयी प्रात्यक्षिक आणि माती नमुना करणे विषयी प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रात्यक्षिक करून याची सविस्तर माहिती कृषी पर्यवेक्षक ज्योती केकान यांनी दिली तर कृषी सहाय्यक अश्विनी जावरे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेविषयी माहिती दिली. शेतकरी आयडी व पीएम किसान कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल उपसरपंच श्री. प्रविण ठाकरे यांनी कृषी विभागाचे आभार मानले.याप्रसंगी सरपंच सौ अलका ठाकरे, उपसरपंच श्री. प्रवीण ठाकरे, अरूण ठाकरे, बाळु ठाकरे, सागर शिंदे, रवि शिंदे, निवृत्ती ठाकरे, वसंत गांगुर्डे , संभाजी ठाकरे, सुमन शिंदे, शशिकला ठाकरे, ताराबाई ठाकरे, सरला ठाकरे, लीला ठाकरे, वंदना शिंदे, आदी शेतकरी बांधव व महिला उपस्थित होत्या.
