Moong Rate : मुगाचे दर वाढणार का? जाणून घ्या काय आहे सध्याची स्थिती..

या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळे मुगाची पेरणी लवकर उरकले याशिवाय क्षेत्रातही वाढ झाली. लवकर पेरणी झाल्यामुळे शेंगा तोडणीलाही काही भागांत सुरुवात झाली आहे. बाजारात साधारण दहा दिवसांमध्ये मुगाची बऱ्यापैकी आवक सुरू होणार असल्याचे बाजार समितीतून सांगितले जात आहे. मात्र मुगाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर राहतील का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,१२५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढली.

येत्या काही दिवसात मात्र खरीप हंगामातील मूगाची आवक बाजारात वाढण्याची शक्यता आहे.राज्यातील पेरणी क्षेत्राचा विचार करता नगर जिल्ह्यातील मुगाची पेरणी राज्यातील एकूण मुगाच्या पेरणीच्या तुलनेत ३५ टक्के आहे. नगर जिल्हा राज्यातील मुग उत्पादनात एक महत्त्वपूर्ण योगदान देतो. या वर्षी मुगाची पेरणी वाढल्यामुळे बाजारात मुगाची आवक वाढण्याची शक्यता आहे.
मुगाची पेरणी वाढल्यामुळे बाजारपेठेत मुगाचे उत्पादन अधिक प्रमाणात येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून मुगाचे दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरवर्षीच्या तुलनेत यांना मुगाची अधिक प्रमाणात पेरणी झाली असल्यामुळे बाजारातही आवक वाढणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

पत्रकार -

Translate »