Onion Maket Rates : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज, कांदा खातोय भाव! दर गेला चार हजारांवर ; जाणून घ्या सविस्तर..
सध्या कांद्याला चांगले दर असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर अचानकपणे कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.श्रावणामध्येच कांदा दराने उसळी घेतल्याने दसरा, दिवाळीपर्यंत दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या किरकोळ बाजारात ५० रुपये दरकांद्याला किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दर आहे. तर प्रतिक्विंटल २५०० ते ४२०० रुपये आहे. मागील आठवड्यापासून राज्यभर कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर ३३ ते ४० रुपये प्रति किलो असताना, मुंबई आणि नवी मुंबईतील किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या दरात ४५ ते ६५ रुपये प्रति किलो इतकी प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होत आहे.
सध्या प्रतिक्विंटल चांगले दर असून, असेच दर राहिल्यास शेतकऱ्यांसाठी कांदा हा बंपर पीक म्हणून लाखोंची उत्पन्न देणार आहे.मागच्या वर्षी दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांचे न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकयांनी कांदा किरकोळ विक्री आठवडी बाजारात केला होता. यामुळे होणारे नुकसान काही प्रमाणात टळले होते. यंदा चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.