बोपाणे येथे अखंड हरिनाम सप्ताह व दत्तात्रेय जन्मोत्सव संपन्न.

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे)

बोपाणे येथे दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्ताने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते रविवार दि.8/122024 ते 15/12/2024या कालावधीत संपन्न झाला वर्ष १८वे   वै.ह.भ.प.नामदेवमहाराज  पठाडे यांच्या आशीर्वादाने दि.आठ रोजी पहाटे तुकाराम महाराज यांच्या हस्ते कलश पुजण करण्यात आले तर विणा पुजण रामचंद्र महाराज व अशोक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वज पुजण नामदेव महाराज गांगुर्डे व  शाम महाराज नवनाथ महाराज तुकाराम महाराज वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. पहाटे चार ते सहा काकडा भजन दुपारी बारा ते एक गाथा भजन सायंकाळी सहा ते सात हरी पाठ व रात्री नऊ ते अकरा किर्तनाचे आयोजन करण्यात आले यावेळी  हे.भ.प. रमेश महाराज आळंदीकर सौरभ महाराज कुंडाणेकर  समाधान महाराज पाटील   समाधान महाराज आळंदीकर  वाल्मिक महाराज गिते  तुकाराम महाराज जेऊरकर राधेश्याम महाराज गाडे यांचे किर्तन संपन्न झाली तर दि. १५ रोजी सकाळी  राधेश्याम महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले या कार्यक्रमाला  प.पु. स्वामी जयदेव पुरी महाराज चंद्रशेवर गड चांदवड व वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांचे आशीर्वाद लाभले या सप्ताहात नांदगाव चांदवड येवला व जिल्ह्यातील नामवंत किर्तन कार  प्रवचनकार  भाविक भक्त उपस्थित होते या सप्ताहाला समस्त दत्त भक्त परिवार  समस्त ग्रामस्थ बोपाणे व दिघवद तरुण युवक मंडळाने परिश्रम घेतले.

पत्रकार -

Translate »