निमगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नागेश ठोंबरे यांची निवड
कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर) : चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी नागेश रतन ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रोटेशन पद्धतीने या आधीचे उपसरपंच देवराम निवृत्ती शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरची निवडणूक घेण्यात येऊन यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रतिभा पाटील यांनी कामकाज बघितले.
यावेळी सरपंच छाया गोधडे, सदस्य देवराम शिंदे, दुर्गा पवार, विमलताई दरेकर, संदीप शिंदे, सुवर्णा दरेकर यांचेसह निमगव्हाण येथील ग्रामस्थ मंगेश दरेकर, छबु शिंदे, कैलास पवार, विठ्ठल जाधव, बबन दरेकर, प्रशांत गायकवाड, शरद जाधव, बबन जाधव, शांताराम गायकवाड हे उपस्थित होते. या वेळी सर्वच ग्रामस्थांनी व सरपंच व सदस्य यांनी नवनिर्वाचित उपसरपंच नागेश रतन ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला.