निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर संपन्न
निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर संपन्न
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉ. वैभव विठ्ठल साठे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दातांची तपासणी करून औषधोपचार केले व मार्गदर्शन केले तसेच आरोग्याच्या चांगल्या सवयी विषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ जगदाळे ,निरंजन शिंदे ,प्रतीक वडनेरे यांनी तपासणीसाठी सहकार्य केले कार्यक्रमासाठी सरपंच छायाताई गोधडे ,उपसरपंच नागेश ठोंबरे ,कैलास पवार , दिगंबर दरेकर ,दत्तात्रय दरेकर ,शांताराम गायकवाड ,शरद गोधडे ,सोनीताई शिंदे , सरला पवार संजय जाधव,अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होते ,या वेळी आलेल्या पाहुण्याचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शांताराम हांडगे यांनी केले सूत्रसंचालन व आभार श्रीमती वृषाली जाधव यांनी केले