दिघवद विद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन.
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते.यामध्ये मनोरंजनात्मक खेळ,मैदानी खेळ,वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.आज पार पडलेल्या वकृत्व स्पर्धांच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कारभारी रसाळ,उपाध्यक्ष दत्तात्रय विठ्ठल गांगुर्डे,संस्थेचे माजी चिटणीस पोपटराव गांगुर्डे,माजी उपाध्यक्ष गंगाधर गांगुर्डे,शाळा समिती अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे,खजिनदार विठ्ठल गांगुर्डे,शिक्षक संचालक सदाशिव गांगुर्डे,नानाभाऊ गांगुर्डे बनुबाई गागरे,माजी सरपंच उत्तमराव झाल्टे,बबन गाडे,पत्रकार कैलास सोनवणे आधी उपस्थित होते.या वकृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्ष स्थानी संस्थेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर ठकाजी गांगुर्डे सर हे होते. राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन गांगुर्डे व सुनील गांगुर्डे यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे,किशोर गांगुर्डे,शशिकांत पाटील,संदीप पाटील,प्रभाकर पेंढारी,सुनील चंदनशिव,अमोल ठोंबरे,गणेश गांगुर्डे,धनंजय गांगुर्डे,सागर गांगुर्डे, शुभम हांडगे,मधुकर गोसावी,साहेबराव घोलप,ओंकार गांगुर्डे,रेणुका कानडे,सुनिता राठोड, हर्षाली भामरे,कलुबाई साबळे,रमा नगराळे, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »