सोनीसांगवीच्या उपसरपंचपदी श्री. प्रविण ठाकरे यांची बिनविरोध निवड

सोनीसांगवीच्या उपसरपंचपदी श्री. प्रविण ठाकरे यांची बिनविरोध निवड.
काजीसांगवीः (उत्तम आवारे) सोनीसांगवी ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच सौ.सोनी अनिल पवार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने सदरची जागा रिक्त झाली होती.सदरच्या जागेवर श्री. प्रविण ठाकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.गेल्या दोन वर्षात सोनीसांगवी गावात विकासाची कामे करण्यात श्री प्रविण ठाकरे हे कृतीशील प्रयत्न करत आहे . त्याचबरोबर विविध शासकीय योजना, विविध प्रकारचे लोकउपयोगी कॅम्प आयोजित केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.तसेच सोनीसांगवीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अलका ठाकरे ह्या त्यांच्या मातोश्री असून आई व मुलगा यांना एकाच वेळी सरपंच व उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी यानिमित्ताने गावाने दिली आहे. याप्रसंगी सरपंच सौ. अलका ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सौ. मंगल ठाकरे सौ.सोनी पवार श्री. किरण ठाकरे श्री. निलेश ठाकरे ग्रामसेविका श्रीम. वंदना भालेराव श्री. दत्तू ठाकरे श्री .रामदास घंगाळे श्री.गोरख घंगाळे श्री. तुकाराम ठाकरे श्री.अजय बनकरश्री.प्रदीप बनकर श्री.गोरख ठाकरे श्री. केशव ठाकरे श्री.विशाल ठाकरे श्री.वसंत गांगुर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

पत्रकार -

Translate »