साळसाणे येथे खंडेराव महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दिनांक ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे घटस्थापना करून सकाळी ८ वाजता काठी ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला.
यात्रेच्या निमित्ताने रोज रात्री वाघे मंडळाच्या जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत:
- रविवार: शाहीर मधुकर जाधव व सोपान साठे सह पार्टी
- सोमवार: सविता साळुंखे व अशोक सदगीर सह पार्टी
- मंगळवार: शिव मल्हार पार्टी, टाकळी विंचूर
- बुधवार: मंदाबाई सोनवणे व पार्टी, कोपरगाव
- गुरुवार: धोंडीराम जाबळे, विजय सोनवणे, भाग्यश्री परदेशी सह पार्टी
यात्रेच्या शेवटच्या दिवशी, बुधवार संध्याकाळी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर कुलदीप शांताराम ठाकरे यांच्या हस्ते “बारा गाड्या ओढण्याचा” कार्यक्रम संपन्न होईल. तसेच, यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे रहाडी होम व लंगर तोडण्याचा विधी पार पडेल. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश महाराज चव्हाण (दरसवाडी), नामदेव गांगुर्डे (वाहेगाव), वाळुदादा (गोलवड रायपूर), जयराम बाबा वाघचौरे (तळेगाव), दत्तू बाबा काळे, बबनभाऊ अहिरे (मनमाड), राजू बाबा बरकले (परसुल), संपत काळे (रेडगाव), निवृत्ती कहडणे, अशोक शिंदे, आत्माराम आहेर (भडाणेकर), कचु बाबा ठाकरे, दत्तू वाघे, कैलास शेलार, माधव कोकणे, राजाराम भोसले तसेच जय मल्हार मंडळ, नाथ साम्राज्य ग्रुप, शिव गर्जना ग्रुप, नाथ बाबा दरबार (परसुल), चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळ (हिरापूर), जय बाबाजी भक्त परिवार व साळसाणे ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.
सर्व भाविक भक्तांनी या पवित्र यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलदीप ठाकरे यांनी केले आहे.

